नंदुरबार : सारंगखेड्यात सर्वात जुन्या अश्वबाजाराला सुरुवात

03 Dec 2017 08:21 PM


दत्त जयंतीच्या निमित्तानं देशातील सर्वात जुन्या अश्व बाजाराला आजपासून नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडामध्ये सुरू झालाय...या यात्रोत्सवास आज दत्तजयंतीच्या निमित्ताने मोठ्या थाटात सुरुवात झाली. गेल्या 300 वर्षांची परंपरा असलेला हा घोड्य़ांचा बाजार दरवर्षी अनेक ऐटदार घोड्यांमुळे आकर्षण ठरत असतो. या घोडे बाजारात पंजाब, हरयाणा, कच्छ, काठीयावाड, उत्तर प्रदेश तसेच अन्य राज्यातील मोठे घोडे व्यापारी आणि अश्व शौकीन आपले घोडे आणतात. या अनोख्या यात्रोत्सवात दरवर्षी आठ ते दहा लाख भाविक श्री दत्ताचे दर्शन घेण्यासाठी येतात.

LATEST VIDEOS

LiveTV