सातारा : महाराजांकडून स्वराज्य स्थापना तोरणावर नव्हे, चंदन-वंदनगडावर?

03 Dec 2017 11:45 PM

स्वराज्य स्थापनेचा विषय निघाला की तोरणा किल्ल्याचं नाव निघतंच. तोरणा किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधले असं आपण इयत्ता चौथीच्या पुस्तकात शिकलो. पण याच माहितीला छेद देणारा दावा केला जात आहे.

स्वराज्याची मुहूर्तमेढ तोरणा किल्ल्यावर नाही, तर चंदन-वंदन गडावर झाल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. महाराजांनी 1646 साली तोरणा किल्ला काबीज केला. पण त्याआधी 1642 साली महाराजांनी चंदन-वंदन किल्ल्यावर स्वराज्याची सुरुवात केल्याचा दावा अभ्यासकांचा आहे.

भुईंजपासून 15 किमी अंतरावर असलेला हा किल्ला सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. सध्या प्रचलित असलेल्या बखरी छत्रपती शिवरायांनंतर शंभर वर्षांनंतर लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे खाफीखान अधिक समकालीन आहे असं चंदनकरांचं म्हणणं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV