सातारा : सोयाबीन खरेदीवरुन राष्ट्रवादी आक्रमक, जानकर, शिवतारेंच्या गाडीसमोर सोयाबीन फेकलं

28 Oct 2017 03:42 PM

सोयाबीन खरेदीच्या जाचक अटींमुळे शेतकरी त्रस्त आहेत, आणि आता याच मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं हात घातलाय. आज साताऱ्यामध्ये दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर आणि साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या गाडीसमोर सोयाबीन फेकून आंदोलन करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून सोयबीन विक्री करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लगतोय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं हे आंदोलन केलं. सरकारकडून सोयाबीन खऱेदी केलं जात नाही. असा आंदोलकांचा आरोप आहे.

LATEST VIDEOS

LiveTV