सातारा : तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांचा वयोश्रेष्ठ पुरस्कारानं गौरव, मंगलाताईंशी खास गप्पा

11 Oct 2017 08:39 PM

तीन पिढ्यांपासून तमाशा या लोककलेचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या मंगला बनसोडे यांना नवी दिल्लीत  वयोश्रेष्ठ सन्मानानं गौरवण्यात आलं. मंगला बनसोडेंबरोबरच नागपुरातील समाजसेवक महादेवराव ज्योतिरामजी मेश्राम यांच्यासह अऩेकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुरस्कार प्रदान केले. याआधी मंगला बनसोडे यांच्या आई आणि प्रख्यात तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर आणि त्यांचे वडील भाऊ नारायणगावकर यांचाही राष्ट्रपती पुरस्कारानं गौरव झाला होता. महादेवराव मेश्राम यांनी निराधार असलेल्या वृद्धांना आधार दिला. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV