सातारा : वेण्णा लेकला गळती, भगदाड बुजवण्यासाठी दोन ट्रक जुने कपडे

20 Nov 2017 03:06 PM

साताऱ्यातील वेण्णालेक धरणाला भलमोठं भगदाड पडलं आहे. ही गळती थांबविण्यासाठी भगदाडात जुने कपडे कोंबण्याचा प्रयत्न रात्रीपासून सुरु आहे.

त्यासाठी तब्बल दोन ट्रक जुने कपडे वापरण्यात आले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. भगदाड बुजवण्यासाठी परिसरातून जुने कपडे गोळा केले जात आहेत.

खरं तर यापूर्वीही वेण्णालेक धरणातून पाण्याची गळती सुरु होती. मात्र तेव्हा तात्पुरती डागडुजी करण्यात आली. आता पुन्हा एकदा धरणातून गळती सुरु झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV