सौदी अरेबिया : भ्रष्टाचारविरोधी कारवाईत राजपुत्राला अटक, 7,800 कोटींचा फटका

09 Nov 2017 08:36 AM

सौदी अरेबियाचे राजपुत्र अल्वालीद बीन तलाल यांना भ्रष्टाचारविरोधातील अभियानाअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर त्यांच्या एकूण संपत्तीला तब्बल 7 हजार 800 कोटींचा फटका बसला आहे. तलाल यांच्या अटकेनंतर किंग्डम होल्डिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 1.2 अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यामुळे हे शेअर्स 19 अब्ज डॉलरवरुन 17.8 अब्ज डॉलरवर गेले आहेत. सौदीतील आजवरच्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारविरोधी कारवाईत 11 राजपुत्र आणि डझनवारी आजी-माजी मंत्र्य़ांना अटक करण्यात आली आहे.

LiveTV