सावंतवाडी : दुरांतो एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरुन घसरलं, कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

26 Oct 2017 08:18 PM

सावंतवाडीजवळ दुरांतो एक्स्प्रेसचं इंजिन रूळावरून घसरलंय... सावंतवाडी आणि झाराप रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडलीय. दरम्यान कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी कोकण रेल्वेच्या वाहतूकीचा चांगलाच खोळंबा झालाय.. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून लवकरात लवकर वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किमान दुरूस्तीसाठी 6 तास लागणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलीय. कोकण कन्या , करमळी, तुतारी एक्स्प्रेस सारख्या महत्त्वाच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय... दरम्यान या अपघातास जबाबदार असलेल्या संबंधीत अधिकाऱ्यांचं कोकण रेल्वेकडून निलंबन करण्यात आलंय...

LATEST VIDEOS

LiveTV