भंडारा : भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर शहीद जवान प्रफुल्ल मोहरकरांच्या कुटुंबाशी बातचित

26 Dec 2017 03:27 PM

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. एलओसी पार करुन भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या तीन जवानांचा खात्मा केला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांकडून हा दावा करण्यात आला आहे.

पाकिस्तानने सोमवारी (25 डिसेंबर) संध्याकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यानंतर भारतीय जवानांनीही त्याला सडेतोड उत्तर दिलं. कारवाई करत पाकिस्तानच्या तीन जवानांना कंठस्नान घातलं. यानंतर भारतीय सैन्याच्या एका पथकाने संध्याकाळी 6 वाजता पुंछमधील रावळकोटच्या रुख चकरी सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या पाकिस्तानच्या तीन सैनिकांना लक्ष्य केलं.

LATEST VIDEOS

LiveTV