नाशिक : बांदीपोरात दहशतवाद्यांशी लढताना नंदुरबारचे मिलिंद खैरनार धारातीर्थी

11 Oct 2017 11:27 PM

काश्मीरमधील बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवान शहीद झालेत. त्यात महाराष्ट्रातल्या नंदुरबारमधल्या सुपुत्राचा समावेश आहे. मिलिंद किशोर खैरनार असं या जवानाचं नाव आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रहिवाशी आहेत. तर एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळतेय. मिलिंद खैरनार यांचं पार्थिव उद्या 9 वाजेपर्यंत ओझरला पोहोचेल त्यानंतर नंदुरबारकडे त्यांच्या मूळगावी रवाना होईल. बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला. भारतीय जवानांकडून या भागात ऑपरेशन केलंय.

LATEST VIDEOS

LiveTV