हिमाचल निवडणूक निकाल : भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार पराभूत

19 Dec 2017 10:51 AM

हिमाचल प्रदेशच्या डोंगरातही भाजपचं कमळ फुललंय...मात्र भाजपच्या आनंदावर प्रेमकुमार धुमल यांच्या पराभवानं काहीसं विरजण पडलंय...भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार धुमल हे सुजानपूरमधून पराभूत झालेत...त्यामुळे आता हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हा प्रश्न निर्माण झालाय. आता जे.पी.नड्डा आणि जयराम ठाकूर यांच्या नावाची चर्चा सुरु झालीये...तसंच संघाचे प्रचारक पवन जम्वाव यांच्या नावाचीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे....धुमल यांच्याप्रमाणेच त्यांचे निकटवर्तीय सतपाल सत्ती यांचाही ऊना मतदारसंघातून पराभव झाला

LiveTV