शिर्डी : अपंगदिनी शाहीर विजय तानपुरेंची गरुड झेप

03 Dec 2017 08:54 PM


आज जागतिक अपंग दिन आहे.. आणि याचच औचित्य साधत शाहिर विजयराव तनपुरे यांनी अपंगत्वावर मात करत आकाशात झेप घेतली. यामागे अपंगांना प्रेरणा देणे हा उद्देश असल्याचं तनपुरेंनी सांगितलं.
महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्काराने सन्मानित कँप्टन आप्पासाहेब ढुस यांच्या मदतीने तनपुरेंनी ही कामगिरी केली. यावेळी त्यांनी शरीराचे अपंग असले तरी मनाने अपंग राहु नका असा संदेश दिला. जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना घाबरुन जावु नका, कुठलेही अपयश आले तरी खचून न जाता मोठ्या जिद्दीने संकटांचा सामना करण्याचा त्यांनी यावेळी संदेश दिला.

LATEST VIDEOS

LiveTV