शिर्डी : ऊस दरासाठी संघर्ष समितीचे कार्यकर्त्यांचं उपोषण

07 Dec 2017 08:54 PM

शिर्डीमध्ये ऊसाच्या दरासाठी ऊस उत्पादक संघर्ष समितीनं आंदोलनाच्या मार्ग पत्करलाय...बुधवारी संघर्ष समिती आणि साखर कारखानदारांमध्ये ऊस दराची बैठक पार पडली...मात्र यामध्ये कोणताही तोडगा न निघाल्यानं लोणीमध्ये संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेत...विशेष म्हणजे ग्रामस्थ आणि पोलिसांच्या विरोधानंतरही संघर्ष समितीचे कार्यकर्ते पद्मश्री विखे पाटलांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला बसलेत..उसाला पहिली उचल 3 हजार 500 रुपये देण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरलीये...दरम्यान संभाजी ब्रिगेडनंही या आंदोलनला पाठिंबा दिलाय...

LATEST VIDEOS

LiveTV