धुळे : वाढत्या गुंडगिरीविरोधात शिरपूरमध्ये व्यापाऱ्यांचा बंद

21 Nov 2017 01:27 PM

वाढत्या गुंडगिरीच्या विरोधात धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमध्ये व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे. बंदमुळे बाजारपेठेत शुकशुकाट बघायला मिळाला. बंदच्या दरम्यान व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशनवर मूकमोर्चा काढला. व्यापाऱ्यांवर हल्ला करणे, खंडणी मागणे, खंडणी न दिल्यास वाहन जाळणे असे प्रकार शिरपूर मध्ये गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. यामुळं व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान पोलिसांना या गुंडगिरीवर अंकुश ठेवण्यात अपयश आल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV