अहमदनगर : श्रीरामपूरजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, 5 मृत्यूमुखी

14 Dec 2017 12:03 PM

शिर्डीमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बेलापूर-श्रीरामपूर रोडवर आज पहाटे हा भीषण अपघात झाला. स्विफ्ट कार, दुधाचा टँकर आणि इंडिका कार एकमेकांवर धडकली. मात्र यामध्ये स्विफ्ट गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV