सिंधुदुर्ग : होडी वाहतूकदारांचा संप, किल्ल्यावर जाणारी वाहतूक बंद

30 Dec 2017 03:45 PM

नववर्षाच्या निमित्तानं तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहण्याचा प्लान बनवत असाल तर थोडं थांबा. कारण सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेनं आजपासून सिंधुदुर्ग किल्ल्यावर केली जाणारी होडी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. होडी वाहतूकदारांच्या समस्यांकडं सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आलाय. 3 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या मालवण जेटी बंदराचे काम अद्याप सुरु झालेले नाही, त्यामुळे होडी वाहतूकदारांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय..त्यामुळं वाहतूकदारांनी हे आंदोलन पुकारलंय.

LATEST VIDEOS

LiveTV