सिंधुदुर्ग : ओखी वादळामुळे भरकटलेल्या तामिळनाडूतील 68 बोटी देवगड किनाऱ्यावर

03 Dec 2017 08:42 PM

दुसरीकडे या वादळामुळे केरळ आणि दक्षिण भारतातल्या भरकटलेल्या बोटींनी सिंधुदूर्गातल्या देवगडच्या किनारी आसरा घेतलाय. केरळ, तामिळनाडूतील ६८ बोटी या ठिकाणी पोहोचल्यात. यातील ९५२ मच्छिमार सुखरुप आहेत. स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप मच्छिमारांनी केलाय.
दरम्यान वेधशाळेने स्थानिक मच्छिमारांना 8 तारखेपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय.

LATEST VIDEOS

LiveTV