सिंधुदुर्ग : कोकणात पेट्रोकेमिकल प्रकल्प येऊ देणार नाही, निलेश राणेंचा इशारा, राऊतांवरही टीका

23 Nov 2017 01:18 PM


भाजप सरकारनं राजापूरमधील रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललंय. मात्र असलं तरी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीनं रिफायनरीवर स्टे आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोकणात पेट्रोकेमिकल रिफायनरी येऊ देणार नाही असा इशारा निलेश राणेंनी दिलाय. यावेळी बोलताना त्यांनी खासदार विनायक राऊतांवरही निशाणा साधलाय. रिफायनरीचे राऩ पेटले तरी खासदार कोकणात फिरकले नाहीत असं निलेश राणे म्हणाले. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष नुकताच एनडीएत सामील झालाय. मात्र रिफायनरीच्या प्रश्नावरून त्यांनी एनडीएच्या विरोधी भूमिका घेतलीय.

LATEST VIDEOS

LiveTV