सोलापूर : पोलीस कर्मचाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत पोलीस वसाहतीत गोंधळ

21 Nov 2017 01:21 PM

सोलापूरमध्येही एका पोलिस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत ड्युटी असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. अरविंद धाम पोलिस वसाहतीमध्ये मद्यधुंद अवस्थेत एक पोलीस कर्मचारी गोंधळ घालत असल्याची तक्रार नियंत्रण कक्षेला आली. फोजदार चावडी पोलिसांचं पथक घटना स्थळी दाखल झालं. पण त्यावेळी या कर्मचाऱ्याने या अधिकाऱ्या सोबतही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्या वरुन पोलीस नाईक विजय नाईकनवरे याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV