सोलापूर : कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या नावाचे भरचौकात फ्लेक्स, पालिकेची अनोखी शक्कल

05 Nov 2017 08:30 PM

मिळकत कर न भरणाऱ्यांची यादी भर चौकात लावून सोलापूर महापालिकेनं कर चुकवेगिरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
सोलापूर महानगरपालिकेने मिळकत कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली. वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या मिळकतदारांना मनपा प्रशासनाने चांगलाच धडा शिकवला. एक लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या मिळकतदारांची यादीच मनपाने शहरात प्रसिद्ध केली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी डिजिटल प्लेक्सवर लखपती थकबाकीदारांची नावे झळकत आहेत. यामुळे मनपा प्रशासनाची थकबाकी वसूल होण्यास मदत होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV