सोलापूर : शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचा लिलाव बंद पाडला

22 Nov 2017 01:15 PM

सोलापूरच्या बाजार समितीमध्ये प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात शेतकरी आणि व्यापारी यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतला कांद्याचा लिलाव बंद पाडला.
बाजार समितीमध्ये वाढलेला चोरट्यांचा सुळसुळाट आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाढलेली दहशत यामुळे ही घोषणाबाजी करण्यात आली.
दमदाटी करून चोरटे कांदा घेऊन पसार होत असल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी बाजार समिती समोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. आणि मालाला सुरक्षितता देण्याची मागणी केली.

LATEST VIDEOS

LiveTV