सोलापूर : बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीदर्शनासाठी प्रेरणाभूमीवर भीमबांधवांची गर्दी

06 Dec 2017 10:18 PM

आज बाबासाहेब आंबेडकरांचा 62 वा महापरिनिर्वाणदिन. महामानवाला अभिवादन करण्याचा दिवस. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीसोबतच आता भीमबांधवांना आणखी एक नवी जागा खुणावू लागली आहे. सोलापूरची प्रेरणाभूमी. बाबासाहेबांच्या अस्थी असणारं हे  मुंबई, नागपूरनंतरचं देशातलं तिसरं श्रद्धास्थान. बाबासाहेबांच्या जुन्या दुर्लक्षित अस्थीविहाराचं कोट्यवधी निधी खर्चून विलोभनीय अशा प्रेरणाभूमीत रूपांतर करण्यात आलं. अशी ही भव्य प्रेरणाभूमी पाहण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या अस्थिविहाराचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील  भीमसैनिक सोलापुरात हटकून येतात.

LATEST VIDEOS

LiveTV