सोलापूर : एसटी बस डेपोतून 16 लाखांची रोकड लंपास

30 Dec 2017 03:45 PM

सोलापूर जिल्ह्यातली ही दरोड्याची घटना  ताजी असतानाच आज सोलापूर बस डेपोमधून तब्बल 16 लाखांची रोकड लांबवल्याची घटना आज सकाळी घडली आहे. राज्य परिवहन मंडळाचे रोखपाल एसटीची जमा झालेली रक्कम बॅगेत भरून बँकेत जमा करण्यासाठी जात होते. त्यावेळी संकटकालीन मार्गातून एका चोरट्यानं प्रवेश केला..आणि ही बॅग घेऊन पसार झालाय. यानंतर आता पोलिसांचा ताफा एसटी डेपोमध्ये दाखल झाला असून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. मात्र दिवसाढवळ्या एवढी मोठी रक्कम लंपास केल्यामुळं सोलापुरातल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं निर्माण होत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV