सोलापूर : ऊसदरासाठी आजही शेतकऱ्यांचं रक्ताच्या बाटल्या फोडत आंदोलन

17 Nov 2017 08:36 PM

सोलापुरात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रक्ताच्या बाटल्या अंगावर फोडत निदर्शनं केली...सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा लोकमंगल सहकारी साखर कारखाना आंदोलकांच्या रडारवर आहे...उसाला 2700 रुपयांचा हमीभाव देण्याची प्रहारची मागणी आहे...प्रहारचे कार्यकर्ते देशमुखांच्या घरासमोर रक्तदान करणार होते मात्र पोलिसांनी विरोध केल्यानं त्यांनी अंगावरच बाटल्या फोडून घेतल्या...काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं...दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली...शेतकरी संघटनेनं कारखानदार चोर हैच्या घोषणा दिल्यानं नाराज कारखानदार बैठक सोडून निघून गेले..दरम्यान
पंढपुरात आज पहाटे कराड उस्मानाबाद बसची आंदोलकांनी तोडफोड केलीय.
प्रवाशांना उतरवून आंदोलकांनी ही तोडफोड केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV