सोलापूर : सोलापूरमध्ये 22 शिक्षक संघटनांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

04 Nov 2017 08:39 PM

सरकार दरबारी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर शिक्षक आक्रमक झाले. सोलापूरमध्ये 22 शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या. चार हुतात्मा पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांनी आज सुट्टीच्या दिवशी आंदोलन केलं. शिक्षक बदलीच संभ्रमात टाकणार धोरण, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांचा पगार 1 तारखेला करावा यासह अन्य मागण्यांसाठी सोलापुरातील प्राथमिक शिक्षकांनी मोर्चात सहभाग घेतला.

LATEST VIDEOS

LiveTV