खेळ माझा : 151 चेंडूत 490 धावा, दक्षिण आफ्रिकेच्या डॅड्सवेलचा वनडे विक्रम

20 Nov 2017 10:18 AM

दक्षिण आफ्रिकेतल्या शेन डॅड्सवेल या वीस वर्षांच्या फलंदाजानं नवा विक्रम रचला आहे. डॅड्सवेलने 151 चेंडूंत 490 धावांची खेळी उभारुन वन डे क्रिकेटमधल्या वैयक्तिक उच्चांकाची नोंद केली आहे.

एनडब्ल्यूई पक आणि पोच डॉर्प संघांत शनिवारी खेळवण्यात आलेल्या 50-50 षटकांच्या सामन्यात डॅड्सवेलनं हा विक्रम साजरा केला. योगायोगाची बाब म्हणजे शनिवारी त्याचा विसावा वाढदिवस होता.

एनडब्ल्यूई पककडून खेळताना डॅड्सवेलनं 151 चेंडूंत 27 चौकार आणि 57 षटकारांसह 490 धावांची खेळी उभारली. त्यामुळेच एनडब्ल्यूई पक क्लबला 50 षटकांत तीन बाद 677 धावांचा डोंगर उभारता आला.

LATEST VIDEOS

LiveTV