माझा स्पेशल : सोलापूर : मुलगी झाल्यावर बिलात 10-100 टक्के सवलत, 'डॉटर्समॉम' संस्थेचा उपक्रम

Thursday, 12 October 2017 8:57 PM

पंढरपुरात बेटी बचाओ अभियानाला डॉटर्स मॉम संस्थेनं नवी दिशा दिली आहे. मुलगी झाल्यावर हॉस्पिटलच्या बिलात डॉक्टारांनी दिलेल्या सवलतीनं अनेक कुटुंबांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोलापुरात गर्भपाताच्या तब्बल 36 घटना समोर आल्या. त्यात 2 डॉक्टरांवर गुन्हेही दाखल झालेत. पण म्हणतात ना की काही वाईट अनुभवातूनच चांगल्या गोष्टी घडतात. तसंच काही इथंही घडलं. सध्या माळशिरस तालुक्यातील कोणत्याही हॉस्पिटलला जा, मुलींना कोणत्याही उपचारासाठी 10 ते 100 टक्क्यांपर्यंत सवलत मिळते.

LATEST VIDEO