स्पेशल रिपोर्ट : अकोला : पातूरमधील किड्स पॅराडाईज शाळेची मनीप्लांट बँक

17 Oct 2017 12:12 PM

सध्या राज्यभरात बँक, पतसंस्था, महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अकोला जिल्ह्यातील पातुरमध्ये काल एक आगळीवेगळी निवडणूक पार पडली. पातुरमधील 'किड्स पॅराडाईज' शाळेतील विद्यार्थ्यांच्या बँक संचालक मंडळासाठी ही निवडणूक झाली. चार वर्गातून निवडून द्यायच्या आठ जागांसाठीची ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यामध्ये चार विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनी संचालक म्हणून निवडले गेले. जानेवारीमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या बँकेत फ़क़्त तीन महिन्यातच 26 हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. विद्यार्थी आपल्याला मिळणाऱ्या खाऊच्या पैशातून या बँकेत पैसे जमा करत बचत करतात.

LATEST VIDEOS

LiveTV