मुंबई : राज्यातील 1300 शाळा बंद करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

03 Dec 2017 12:00 AM

राज्य सरकारने महाराष्ट्रातील शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कमी गुणवत्तेमुळे ज्या शाळांची पटसंख्या घटली आहे, अशा जवळपास 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

तसा पत्रव्यवहार शिक्षण विभागाने राज्यातील सर्व  जिल्हाधिकाऱ्यांशी केला आहे.

त्यानुसार, ज्या शाळातील पटसंख्या कमी आहे अशा विद्यार्थ्यांना जवळच्याच म्हणजेच सध्याच्या शाळेपासून 3 किमी असलेल्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.

अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे. अशा शाळांना शिकविण्यासाठी शिक्षकही येत नसल्याचं समोर आल्यानंतर, सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या डिसेंबर महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV