जिल्हा बँका विलीनीकरणाच्या सरकारच्या हालचाली, राष्ट्रवादीचा मात्र विरोध

05 Nov 2017 07:57 PM

राज्यातील डबघाईला आलेल्या जिल्हा बँकांचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्यासाठी सरकारने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेली ही समिती अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहे. सरकारकडून याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV