नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खगोलप्रेमींना 'सुपरमूनची' पर्वणी

01 Jan 2018 10:24 AM

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आज रात्री सर्वांना सुपरमून साध्या डोळ्यांनी दिसणार आहे. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनूसार, आज सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी पौंष पोर्णिमेला सुरुवात होईल. चंद्र पृथ्वीच्या साधारण तीन लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र आज तो तीन लाख 56 हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. भुवनेश्वर, कट्टक, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि मुंबईतून हा सुपरमून साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV