गुजरात : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या वेशातील चिमुरडा

02 Dec 2017 11:30 PM


सुरतमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या एका कार्यक्रमात त्यांच्याच वेशातील एक चिमुरड्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. भाषणानंतर स्वतः मनमोहन सिंह यांनी या चिमुरड्याची भेट घेतली. 10 वर्षाच्या सत्यमची माजी पंतप्रधानांनी विचारपूस केली. यावेळी या मुलानं आपल्याला मनमोहन सिंह आणि राहुल गांधी आवडतात, तसंच मोदी आवडत नसल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे आपण बोलत नाही काम करतो असं सांगत सत्यमनं मनमोहन सिंहांसह सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडलं.

LATEST VIDEOS

LiveTV