सुरत : मंत्रजपाच्या बहाण्यानं बलात्काराचा आरोप, जैन मुनी शांतीसागर अटकेत

15 Oct 2017 01:18 PM

जैनमुनी शांतीसागर यांना बलात्काराच्या आरोपांवरून सुरत पोलिसांनी अटक केली. एका तरुणीनं केलेल्या आरोपांवरून पोलिसांनी ही कारवाई केली. काल दिवसभर शांतीसागर यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. पीडित तरुणी ही 1 ऑक्टोबर रोजी आपल्या कुटुंबियांसमवेत शांतीसागर यांच्याक़डे गेली होती. त्यावेळी मंत्रजप करण्याच्या बहाण्याने बोलावून शांतीसागर यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पिडीत तरुणीनं केला. शांतीसागर यांच्या अनुयायांच्या भीतीनं आपण आजपर्यंत तक्रार केली नसल्याचं पीडित तरुणीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV