ठाणे : सर्व्हर बंद असल्यामुळे 12-12 च्या मुहूर्तासाठी आग्रही जोडप्यांचा हिरमोड

12 Dec 2017 11:39 PM


12 व्या महिन्याच्या 12 तारखेला अर्थात 12-12 ला विवाहासाठी उत्सूक असणाऱ्यांचे संगणकीय प्रणालीनेच बारा वाजवले.. ठाण्याच्या गडकरी रंगायतन जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचा सर्व्हर बंद पडल्याचा फटका अनेक जोडप्यांना आणि वऱ्हाडींना बसला. या कार्यालयात 12-12 या खास दिवशी विवाह नोंदणी करण्यासाठी अनेक जोडपी आली होती. अनेकांनी यासाठी ऑनलाईन सोपस्कारही पार पाडले होते. पण प्रत्यक्षात नोंदणी करायची वेळ आली तेव्हा सर्व्हर बंद असल्यानं ऑनलाईन नोंदणी होवू शकली नाही

LATEST VIDEOS

LiveTV