ठाणे : शिक्षकावर तलवारीने वार, मुख्याध्यापकानेच सुपारी दिल्याचं उघड

15 Dec 2017 08:51 AM

ठाण्याच्या ज्ञानोदय शाळेतील शिक्षकावर तलवारीनं हल्ला करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना शाळेतील मुख्यध्यापकाने 10 हजारांची सुपारी देऊन शिक्षकाला ठार मारण्याची सुपारी दिली होती. मात्र सुपारी देणारा मुख्याध्यापक आणि त्याचा मुलगा अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. शाळेत फक्त सही करुन मुख्यध्यापक रमेश मिश्रा पळून जात असल्याची तक्रार शिक्षक महाजन प्रजापती यांनी केली होती. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून प्रजापती यांच्या सुपारीचा कट शिजत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.

LATEST VIDEOS

LiveTV