ठाणे-नवी मुंबईकरांचा खोळंबा, कळवा-विटावा रस्ता 4 दिवस बंद

22 Dec 2017 03:21 PM

ऐन वीकेन्डला ठाणे-नवी मुंबई परिसरातील प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. एकीकडे हार्बर मार्गावर रेल्वेचा जंबो ब्लॉक असताना नवी मुंबई-ठाणे रस्त्याचंही काम सुरु असल्यामुळे पुढचे चार दिवस हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कळवा-विटावा मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. या कामामुळे पुढचे चार दिवस हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून बेलापूर रोडने ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

LATEST VIDEOS

LiveTV