ठाणे : गॅस सिलेंडरच्या स्फोटात 10 झोपड्या जळून खाक

11 Dec 2017 11:39 PM

ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील भीमनगर झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटात आजूबाजूच्या 10 झोपड्या आगीत जळून खाक झाल्यात. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटाच्या हादऱ्यानं आजूबाजूच्या घरातील पत्रे उडाले. दरम्यान अग्निशमन दलानं आग विझवली असून अनेक झोपड्यांमधील सामान जळून खाक झालं. घटनास्थळी पोहचलेल्या महापौर मीनाक्षी शिंदेंनी झोपडपट्टीवासियांचं तूर्तास पालिकेच्या शाळेत पुनर्वसन करण्यात येईल असं सांगितलं

LATEST VIDEOS

LiveTV