ठाणे : क्रूरपणाची हद्द... झोपलेल्या कुत्र्याला कारखाली चिरडलं!

28 Oct 2017 11:27 AM

क्रूरपणाची हद्द पार करणारी घटना ठाण्यात घडली आहे. एका व्यक्तीने मुद्दामहून भटक्या कुत्र्याच्या अंगवरुन गाडी चालवून त्याला ठार केले आहे. ही घटना निवारा पालस्प्रिंग सोसायटी या ठिकाणी घडली आहे.

24 ऑक्टोबरला घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागला आहे. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसते आहे की, आरोपी गिरीश संत आपल्या चारचाकीमधून पुढे येत असताना, सोसायटीमध्ये बसलेल्या एका कुत्र्यवार त्याने मुद्दामहून गाडी चढवली.

धक्कादायक म्हणजे, गाडीखाली कुत्रा चिरडला गेला असल्याचे माहिती असूनही, गिरीश संत याने गाडी खूप वेळ तशीच ठेवली.  क्रूरपणाची हद्द म्हणजे, त्याने कुत्र्यावरुन गाडी पुढे नेल्यानंतर पुन्हा मागे घेतली आणि तडफडत असलेल्या कुत्र्यावर चढवली.

LATEST VIDEOS

LiveTV