ठाणे : उत्पादन शुल्क विभागाच्या परिसरात भंगाराचं साम्राज्य

01 Nov 2017 11:36 AM

राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या ठाणे पूर्वेकडील उपायुक्त कार्यालयाच्या परिसरात जुन्या वाहनांच्या भंगारामुळे इथल्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला,
अपुऱ्या जागेत ठेवलेल्या या वाहनांना गंज चढलाय आणि यामुळे इथे डासांचा प्रादुर्भाव होऊन रहिवाशांना डेंग्यूची लागण झाली.
त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्यात यावी असं मनसेनं सांगितलं, वारंवार तक्रारी केल्यानंतरही भंगार उचलण्यात दिरंगाई केली जात असल्यामुळे आता कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही मनसे तर्फे देण्यात आला.

LATEST VIDEOS

LiveTV