ठाणे : नियोजन भवनातील सौरऊर्जा वापराचा प्रयोग यशस्वी

26 Nov 2017 10:42 AM
सौरउर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर त्याचा शुभारंभ ठाण्यातील नियोजन भवनाच्या इमारतीपासून करण्यात आलाय. ३० किलोवॅटच्या प्रकल्पातून नियोजन भवनाच्या लिफ्ट्स, जिने आणि पॅसेजमधील दिवे, एअरकंडीशन हॉलमधील वीजेची गरज भागवून उर्वरित वीज एमएसईबीला दिली जातेय. या प्रकल्पाची एकूण किंमत २२ लाख रुपये आहे. यातून दिवसाला १२० ते १५० युनिट वीजनिर्मिती होत असून, यामुळे नियोजन भवनाचे वर्षाला जवळपास ४ लाख रुपयांची बचत होते.


LATEST VIDEOS

LiveTV