ठाणे : फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांची 18 नोव्हेंबरला जाहीर सभा

09 Nov 2017 01:27 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहेत.

रेल्वे स्टेशन परिसरातून फेरीवाल्यांना हटवण्यासाठी दिलेलं अल्टिमेटम संपल्यानंतर, मनसेने ठाणे स्टेशनपासून खळ्ळ खटॅक आंदोलनाला सुरुवात केली होती.

कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर आता फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर लोकांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV