ठाणे : सुलभ प्रसुतीसाठी चक्क जनावराच्या औषधांचा वापर!

23 Nov 2017 11:18 AM

सुलभ प्रसुतीसाठी जनावरांसाठी वापरलं जाणारं औषध माणसांसाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातल्या पाचपाखाडी भागात उघडकीस आला आहे. जनावरांसाठी वापरल्या जाणार्‍या ऑक्सिटोसिन या औषधाची बिलाशिवाय खरेदी करुन त्याची विक्री मानवी रुग्णांसाठी केली जात असल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील आधार रुग्णालयात 19 सप्टेंबर रोजी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेसाठी या औषधाची विक्री झाल्याची माहिती आहे.

LATEST VIDEOS

LiveTV