ठाणे : ऐरोलीच्या वाहतूक कोंडीत अभिनेता वैभव मांगलेही अडकला

23 Dec 2017 10:39 AM

कळवा-विटाव्यात रस्त्याचं काम सुरु असल्यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक कालपासून ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक ऐरोलीचाही टोल भरावा लागत आहे. म्हणूनच चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

ऐरोली टोलनाक्याजवळ टोलवसुलीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांना चार दिवसांसाठी नो एण्ट्री असल्यामुळे सोमवारपर्यंत हा रोडब्लॉक पाहायला मिळणार आहे. कळवा-विटावा रेल्वेब्रीज खालील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. या ठिकाणी  पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV