ठाणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा

15 Dec 2017 09:24 AM

शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण 53 जागांपैकी 26 जागांवर विजय मिळवत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजप 14 आणि राष्ट्रवादीने 10 जागा मिळवल्या आहेत.
शिवसेनेने अंबरनाथ आणि शहापूरमध्ये राष्ट्रावादीशी युती केलेली आहे. या दोन्हीही ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली आहे. या निकालामध्ये काँग्रेसची जोरदार पिछेहाट झालेली दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या 53 जागांपैकी काँग्रेसला केवळ एका जागेवर यश मिळालं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV