ठाणे : झेपी निवडणुकीत भाजप उमेदवारांना मत नको, भाजपच्याच सरचिटणीसांचं आवाहन

12 Dec 2017 10:21 AM

बुधवारी होणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना मतदान करु नका, असं आवाहन भाजपच्याच जिल्हा सरचिटणीस शरद म्हात्रे यांनी केलं आहे. यामुळे ठाण्यातील भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे. तसंच राष्ट्रवादीतल्या अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश करत तिकीटं मिळवली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचेच लोक भाजपचा बुरखा घालून निवडणूक लढवत असल्याचा आरोप शरद म्हात्रे यांनी केला आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV