कोलकाता : ज्येष्ठ गायिका गिरीजा देवी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

25 Oct 2017 08:15 AM

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण गिरीजा देवी यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोलकात्यातील बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गिरीजा देवी बनारस घराण्यातील शास्रीय गायिका होत्या. शास्रीय संगीतातील ठुमरी गायन प्रकारात त्यांचा विशेष नावलौकीक होता. त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘ठुमरीची राणी’ म्हणूनही ओळखलं जात होतं.

LATEST VIDEOS

LiveTV