दंगल गर्ल फातिमा शेखचा साडीतला फोटो इन्स्टावर अपलोड, सोशल मीडियावर फातिमा ट्रोल

15 Oct 2017 01:09 PM

दंगल गर्ल फातिमा सना शेख हीच्या एका सेल्फीवरुन सोशल मीडियावर वादळ तयार झालं आहे. साडी घातलेला हा साईड पोझ सेल्फी फातिमानं इन्स्टाग्रामवर शेअर केलाय आणि त्याला शेमलेस सेल्फी असं कॅप्शन दिलंय. मात्र हा फोटोत ज्याप्रकारे फातिमानं साडी नेसलीय, ते अनेकांच्या पचनी पडलेलं दिसत नाही. यामुळं या फोटोवर कमेंट्सचा भडीमार होताना दिसतोय. याआधीही फातिमा तिच्या स्विमसुटमधल्या फोटोमुळं सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. त्यानंतर तिला पुन्हा ट्रोल करण्याची ही दुसरी वेळ आहे.

LATEST VIDEOS

LiveTV