मुंबई : भाजप प्रवेशासाठी 5 कोटी, हर्षवर्धन जाधवांच्या गौप्यस्फोटानंतर सेना-भाजप आमनेसामने

15 Nov 2017 09:57 PM

भाजप प्रवेशासाठी आपल्याला ५ कोटींची आॅफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट केलाय शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी... धक्कादायक गोष्ट म्हणजे भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही ऑफर दिल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी एबीपी माझाशी बोलतांना सांगितलंय. माझ्यासह २५ आमदारांना भाजप प्रवेशासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. गेल्या महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी एका भेटीदरम्यान ही ऑफर दिली होती. असं सांगायलाही हर्षवर्धन जाधव विसरले नाहीत.
विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई असून ते औरंगाबादेतील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत...

LATEST VIDEOS

LiveTV