स्पेशल रिपोर्ट : उल्हासनगरमध्ये अनोखा सत्संग, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हेडफोनची सोय

20 Oct 2017 09:27 PM

उल्हासनगरच्या गोल मैदानात सप्टेंबर महिन्यापासून 40 दिवस अमृत वेली परिवाराचा हा सत्संग चालतो. मागील अनेक वर्षांपासून चालणाऱ्या या सत्संगाची वेळ असते पहाटे पावणेचार ते पाच! शिवाय मैदानाच्या चारही बाजूंना रहिवासी भाग. त्यामुळं इतक्या पहाटे स्पीकर्स लावून सत्संग केला, तर परिसरातल्या लोकांची झोपमोड होण्याची भिती असते. शिवाय इतक्या पहाटे सत्संग केल्यानंतर त्यातून होणारं ध्वनीप्रदूषण वेगळंच. त्यामुळं हे सारं टाळण्यासाठी यंदाच्या वर्षीपासून या सत्संगात खास हेडफोन्स तयार करण्यात आले आहेत. समोरच्या भव्य स्टेजवर शीख समुदायाचे संत भाईसाहब भजन आणि प्रवचन करतात. त्यांना वाद्यांचीही साथ असते. मात्र, त्यांचा आवाज स्पीकरकडे न जाता तो जातो थेट भाविकांच्या हेडफोनमध्ये, आणि भाविकही कानात हेडफोन घालून सत्संगात तल्लीन होऊन साथ देतात.

LATEST VIDEOS

LiveTV