लखनौ : बेभान होऊन राधे माँचा डान्स, भक्तांनी फुलं, नोटा उधळल्या

27 Oct 2017 12:03 PM

नौटंकीची महागुरु राधे माँनं पुन्हा एकदा ठुमके लगावले. उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राधे माँ तिच्या भक्तांसमोर बेभान होऊन नाचली. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये कल्की उत्सवात, राधे माँ भक्ती गीतावर नाचत होती. यावेळी अनेक भक्तांनी तिच्याभोवती गराडा घातला होता. राधे माँ नाचत नाचतच देवीच्या रुपात भक्तांना आशिर्वाद देत होती. महत्त्वाचं म्हणजे भक्तांनीही राधे माँवर पुष्पवृष्टी केलीच, शिवाय नोटांचाही पाऊस पाडला.

LATEST VIDEOS

LiveTV