आग्रा : विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर सलमान खानचा फोटो, विद्यापीठाची 'प्रिंटिंग मिस्टेक'

22 Nov 2017 01:09 PMउत्तर प्रदेशातील आग्रा विद्यापीठाने दिलेल्या एका मार्कशीटनुसार अभिनेता सलमान खानने बीएची परीक्षा दिली असून त्याला ३५ टक्के मार्क मिळाले आहेत तर सलमान खानव्यतिरिक्त काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या विद्यापीठातून परीक्षा दिली असल्याचं मार्कशीटवरून उघड झालं आहे.
याविषयी अधिक तपास केल्यानंतर लक्षात आलंय की विद्यार्थ्यांच्या मार्कशीटच्या छपाईचं काम एका त्रयस्त कंपनीला देण्यात आलं होतं.
मात्र कंपनीने घातलेल्या घोळामुऴे मार्कशीटवर विद्यार्थ्यांच्या फोटोंऐवजी सलमान आणि राहुल गांधींचा फोटो छापण्यात आलाय.
मात्र आमच्या कडून कोणतीही चूक झालेली नाही असं आग्रा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी सांगतायत.

LATEST VIDEOS

LiveTV